एक कामगार होरपळला
| खेड | प्रतिनिधी |
कोकणातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीत (शनिवार) मध्यरात्रीनंतर प्रिव्ही कंपनीत आग लागल्याची घटना घडली. यावेळी एकापाठोपाठ एक झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला. या आगीत एक कामगार भाजला असून, कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील सर्वात मोठी रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे आहे. गेल्या दोन वर्षात या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यातून आग लागून काही कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जण जायबंदी झाले आहेत. या दुर्घटनांमुळे लोटे पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, शनिवारी दि 16 रोजी मध्यरात्रीनंतर प्रिव्ही कंपनी (जुनी रत्नागिरी केमिकल) या कंपनीत प्रक्रिया सुरू असताना अचानक आग लागली.