घाटावरील, घाटाखाली जनतेचे प्रेम एकसारखे

संजोग वाघेरे पाटील यांचे प्रतिपादन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शिवसैनिक प्रचंड कट्टर आणि निष्ठावंत असल्याचा अनुभव मला मागील तीन महिने येत आहे. या भागातील कार्यकर्ते यांच्याकडून मोठा सन्मान मिळत असून आपण मावळमध्ये फिरत आहोत असा अनुभव मिळत असल्याने इंडिया आघाडीची महविकास आघाडीची ताकद वाढत आहे असा विश्‍वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला. सुरुवातीला सर्व तालुका पदाधिकार्‍यांची वाघेरे पाटील यांच्याशी ओळख करून देण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात कर्जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे उपशहर अध्यक्ष कृष्णा जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तर युवासेनेचे पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. वाघेरे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात संघटनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या फुटीनंतर नितीन सावंत यांनी उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रत्येक गावात शिवसैनिक यांना बळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक यांचा हा मतदारसंघ असल्याने मला देखील या ठिकाणी बरेच शिकण्यासाखरे आहे. त्यामुळे घाटावरील मावळ आणि पिंपरी चिंचवड भागात प्रेम मिळते तसे प्रेम कर्जत आणि खालापूर मतदारसंघातील जनता दिसून येत असल्याने मी धन्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

मी या ठिकाणी नवखा असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँगेस तसेच आप आणि अन्य सर्व पक्ष यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, जिल्हा महिला संघटक सुवर्णा जोशी, महिला तालुका संघटक करुणा बडेकर, कर्जत तालुका संघटक बाबू घारे, तालुका संघटक सुमन लोंगले, आवेश जुवारी, सुरेश गोमारे, प्रमोद सुर्वे, प्रदीप ठाकरे, पंढरी राऊत, प्रथमेश मोरे, संपत हडप, नितीन धुळे, माधव कोळंबे आदी उपस्थित होते.

Exit mobile version