पालवी फुटल्याने आंबा हंगाम लांबणीवर

| अलिबाग । वार्ताहर ।

गेल्या काही वर्षांपासून आंबा बागांचे गणित बिघडल्याचे दिसून येत आहे. हंगाम लांबणीवर अन् उत्पादनातही घट होत आहे. आंबा ऐन बहरात असतानाच वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे बागायतदारांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात दरवर्षी 60 ते 70 टक्के घट होत असल्याचे विक्रमगडमधील आंबा बागायतदार सांगत आहेत. यावर्षीही नोव्हेंबरमध्येच आंब्याला पालवी फुटल्यामुळे मोहोर येण्याची शक्यता कमी झाली आहे.

या वर्षी लांबलेला पाऊस तसेच नोव्हेंबर महिन्यात योग्य थंडी पडून मोहोर येण्याच्या पोषक काळात वातावरणात बदल झाल्याने आंबा झाडांना मोहोर न येता मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटली आहे. त्यामुळे आंबाच्या झाडांना मोहोर येईल की नाही या चिंतेत तालुक्यातील आंबा बागायतदार आहेत.

Exit mobile version