रुग्ण कमी होताच मास्क गायब

। पनवेल । वार्ताहर ।
कोरोनाची साथ काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे.त्यानुसार सर्वच जिल्ह्यात अथवा पालिका क्षेत्रात मास्क गायब झाले आहेत. यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.विनामास्क फिरणा-यांवर पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाची कारवाई देखील थंडावली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला 453 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.पालिका क्षेत्रात 67181 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती.यापैकी 65386 जण कोरोनातुन सुखरूप बरे झाले आहेत. 1342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.आजही सरासरी 50 रुग्ण दररोज पालिका क्षेत्रात वाढत असल्याने अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसर्‍या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. नुकतीच दुसरी लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आलेला असला तरी सोशल डिस्टंसिंग, मास्क आदी नियम पायदळी तुडविले जात आहेत. मागील दोन महिन्यापासून विनामास्क फिरणार्यांची संख्या कमी झाली आहे. साथ नियंत्रणात आल्याने नागरिक मास्कचा वापर टाळत आहे. प्रशासन देखील याबाबत कारवाई करीत नसल्याने मास्क देखील गायब झाले आहे.

Exit mobile version