रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यावर
। पनवेल । वार्ताहर ।
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यावर पोहचले आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असुन सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट देखील नियंत्रणात आल्याने रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे.
सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात 64 हजार 172 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 85 हजार 899 रुग्ण कोव्हिडवर मात करून पूर्णपणे बरे झाले तर 1324 जणांचा या बाजारातून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकेकाळी पालिका क्षेत्रात सक्रिय रुग्णांचा आकडा हजारोंच्या संख्येने होता. त्यांच्यावर पालिकेला नियंत्रण मिळविण्यास यश आले असुन सध्याच्या घडीला केवळ 403 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील आयुक्त गणेश देशमुख यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र शासनामार्फत त्यांची अचानक बदली ठाणे येथे अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. यावेळी सुधाकर देशमुख यांनी देखील कोरोनाची परिस्थिती योग्य रित्या हाताळली. चार महिन्यापूर्वी पुन्हा गणेश देशमुख यांची पनवेलच्या आयुक्तपदी वर्णी लागल्यावर दुसरी लाट असताना देशमुख यांनी परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांनी देखील आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जाणीवपूर्वक परिस्थिती हाताळली.
दुसरी लाट थोपविण्यात पालिकेला यश आले असले तरी पालिकेने तिसर्या लाटेची सर्वतोपरी तयारी केली आहे. कळंबोली याठिकाणी 650 बेड्चे जम्बो कोव्हिड केअर सेंटर सिडकोच्या मदतीने तयार झाले असल्याने भविष्यात तिसरी लाट आली असली तरी पालिका प्रशासन याकरिता पूर्णपणे त्यासाठी तयार असल्याचे आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
कोविड रुग्ण संख्या
एकुण रुग्ण – 65899
बरे झालेले रुग्ण – 64172
मृत्यू – 1324
सक्रिय रुग्ण – 403