रशियाने पोलीस हेडक्वार्टर्ससह प्रसुतीगृहावरही केले बॉम्ब हल्ले

। युक्रेन । वृत्तसंस्था ।
रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयांवरती जोरदार हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाकडून युक्रेनमधली प्रसुतीगृहासह पोलीस हेडक्वार्टर्सवरती हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रशियाला नेमकं काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या दोन्ही देश एका निर्णायक ठिकाणी पोहोचले असून पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रशियाकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरावरती बॉम्ब हल्ले होत असल्याने तिथल्या इमारती पुर्णपणे खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे तिथले नागरिक घाबरले असून त्यांनी मदतीसाठी अनेक देशांना आवाहन केले आहे. रशियाकडून बॉम्ब हल्ला थांबावा यासाठी इतर देशांकडून देखील प्रयत्न सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Exit mobile version