। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान शहरात पहाटे पावसामुळे दस्तुरी ते अमन लॉज स्टेशन परिसरात एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले होते. मात्र, पर्यटकांची गर्दी असल्याने तैनात असलेले पालिका बांधकाम सफाई कर्मचारी यांनी तत्काळ ते झाड रस्त्याच्या बाजूला काढले.
माथेरान शहरात असलेली गर्द वनराई मुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यात पहाटे दस्तुरि ते अमन लॉज या महात्मा गांधी रस्त्यावर मोठे झाड कोसळले. त्या झाडांच्या फांद्या एवढ्या मोठ्या होत्या की त्या झाडाच्या फांद्यांना संपूर्ण रस्ता झाकून गेला होता. सलग सुट्ट्या यांच्यामुळे सकाळपासून माथेरानला पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर कोसळलेले झाड यामुळे पर्यटकांना येण्या जाण्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळताच माथेरान पालिकेने तत्काळ सफाई आणि बांधकाम कर्मचारी यांना त्या ठिकाणी पाठवले. कामगारांनी काही वेळातच रस्त्यावर कोसळलेले झाडं बाजूला केले आणि महात्मा गांधी रस्ता पुन्हा पूर्ववत झाला. पालिकेने दाखवलेली तत्परतेबद्दल व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.