बेपत्ता महिला तीन महिन्यांनी सापडली

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पळवून नेल्याचा गुन्हा
| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील पोशीर ग्रामपंचायतीमधील चिंचवाडी येथील 22 वर्षीय महिला हरविली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर नातेवाईकांंनी अनेक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केलेली महिला 11 सप्टेंबर रोजी आपल्या घरी परतली.दरम्यान, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्या महिलेला फसवून फार्म हाऊसवर नेण्यात आले होते, असा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, त्याच वाडीमधील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

नेरळजवळची देवपाडा रस्त्यावर असलेल्या चिंचवाडीमधील एक 22 वर्षीय महिला घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी ती हरवल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तीन महिने त्या महिलेचा शोध स्थानिकांनी केला. त्याचवेळी नेरळ पोलिसांनी हरवलेल्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर महिला त्या तरुणाच्या तावडीतून सुटून 11 सप्टेंबर रोजी आपल्या घरी चिंचवाडी येथे पोहोचली. त्यानंतर कुटुंबियांनी त्या महिलेला कुठे गेली होती, कोणाबरोबर गेली होती, अशी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या महिलेला काहीही माहिती दिली नाही, परंतु 13 सप्टेंबर रोजी त्या महिलेला गावातील एका व्यक्तीने आपल्याला पळवून नेले होते आणि एका फार्म हाऊसवर वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता. त्यावेळी डांबून ठेवून ती व्यक्ती असे प्रकार करीत होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास मारण्याची धमकी त्या व्यक्ती कडून पीडित महिलेला दिली जात होती.

मात्र, भोईरवाडी येथील फार्म हाऊसमध्ये संबंधित व्यक्ती नसल्याचे पाहून तेथून पळून आपले घर गाठले आहे. त्याबाबत सविस्तर माहिती त्या महिलेने नेरळ पोलिसांकडे दिली असून, नेरळ पोलीस ठाण्यात चिंचवाडीमधील त्या व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला अटक केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version