पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल मिळाला परत

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरविलेला महागडा मोबाईल तक्रारदाराला तांत्रिक तपासाच्या आधारे पुन्हा मिळवून दिला आहे. शहरातील लाईन आळी येथे राहणार्‍या तेजश्री मनीष साखरे या आजारी असल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा आयफोन 14 प्लस मोबाईल हा घरातून चोरीला गेला होता. या मोबाइलच्या चोरी बाबत पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पो.हवा. अमोल पाटील, मिथुन भोसले, विशाल दुधे आदींचे पथकाने तांत्रिक तपास सुरू करून हा मोबाईल पनवेल कोळीवाडा येथील एका निर्जन ठिकाणी झुडूपांमध्ये सापडला. त्यानंतर हा मोबाईल आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण करून तो तेजश्री यांना पुन्हा सुपूर्द करण्यात आला.

Exit mobile version