| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात घरफोडीसह मोबाईल चोरी करणार्या दोन सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहर परिसरात मोबाईलचोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यासंदर्भात आरोपींना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिंदे व पोलीस निरीक्षक जोशी यांनी या चोरांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे दोन पथके तयार केले. त्यामध्ये सहाय्य्क पोलीस निरीक्षक दळवी, अभयसिंह शिंदे, पोहवा. वाघमारे, पोना.राठोड, पोशि. दुधे, मिसाळ, रविंद्र राऊत, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि प्रसाद घरत आदींनी या चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाद्वारे आरोपी सुमित भरत उदरेजा, तसेच फरीद अक्रम कोकरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यांतील मोबाइल व इतर ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.