| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील गावदेवी बाहे यांच्यावतीने खेळविण्यात आलेल्या खांब विभागीय क्रिकेट स्पर्धेत मोरया 11 खांब संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करून गावदेवी चषकावर आपले नाव कोरले.
खांब विभाग क्रिकेट असोसिएशनच्या सहयोगाने व गावदेवी बाहे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक जगदीश थिटे, ग्रा.पं.सदस्य रवींद्र राऊत, युवा कार्यकर्ते रुपेश बामुगडे, मनोज थिटे, परेश थिटे, सागर सकपाळ, रोशन मोरे आदींच्या हस्ते करण्यात आले. क्रिडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत गावदेवी नडवली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर धाक्सुद चिल्हे संघाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत मँन ऑफ द सिरीज रोशन कोंडे चिल्हे, उत्कृष्ट फलंदाज मंगेश राऊत, उत्कृष्ट गोलंदाज चेतन टवले यांना मनेश थिटे, राजेश माठल, राहुल थिटे, स्वप्नील चव्हाण, ओमकार थिटे, साहिल राऊत, रोहित थिटे, ज्ञानेश्वर देवकर आदींच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत दरम्यान माजी उपसरपंच बाळा भोईर, ज्ञानेश्वर भोईर, राजेश सुटे, श्याम लोखंडे, नरेंद्र माळी सर, नंदकुमार मरवडे सर, प्रवीण थिटे, कल्पेश पवार आदींनी उपस्थिती नोंदवून मंडळाचे उपक्रमाचे कौतुक केले. सर्व सामन्यांचे समावलोचन सुमित भोईर व प्रशांत भोईर यांनी केले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.





