पशुपक्षी यांचा गावाकडे मोर्चा,वनसंपदेची प्रचंड हानी, वनखात्याचे दुर्लक्ष
। कोलाड । वार्ताहर ।
मार्च महिना सुरु होताच वणवे लावण्याच्या प्रमाणात आता प्रचंड वाढ झाली असून अक्षरशःसुकेली व खांबचा डोंगरच्या डोंगर आगीच्या भस्मस्थानी होरपळतांना दिसत आहेत त्यामुळे प्रचंड वनसंपदेची हानी होत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली असून अगीच्या भीतीने पशु-पक्षी यांचा मोर्चा गावाकडे वळला असल्याचे दिसून येत असून याकडे वनखात्याचे दुर्लक्ष व डोळे झाक होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
दररोज डोंगरांना प्रचंड लावण्यात येत असलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील सुकेली खांब,या ठिकाणचे डोंगर या वणव्यात होरपळताना दिसत आहेत. तर सततच्या लागत असलेल्या वणव्यामुळे डोंगरात वनव्यांमुळे आगीचे तांडव यांनी वनसंपदेची प्रचंड हानी होत असुन यामुळे पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांचा जिव तुटत आहे. तर हाकेच्या अंतरावर असलेल्या कोलाड, येथील वनखात्याला मात्र याच काहीच वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थिती वरुन दिसुन येत असल्याने वनखाते डोळे झाक करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे .
सरकारकडून पर्यावरणावर कोटीच्या कोटी रुपये खर्च करून जंगलात तसेच विविध ठिकाणी सामाजिक वनीकरण खाते कोट्यवधींच्या संख्येने झाडे लागवड करण्याचा अभियान राबतात परंतु यातील किती झाडे जगली आणि किती गेली अद्याप याचा हिशेब लागला नाही. गेली सात ते आठ वर्षांपासुन शिकार करणे व इतर कामासाठी डोंगरांना वणवे लावण्याचा प्रमाण वाढत असुन यामुळे संपूर्ण वनसंपदेची प्रचंड हानी होत आहे निसर्ग ही दिवसेंदिवस आपले रूप बदलत असतांना दिसत असुन कधी चक्री वादळ तर वेळेवर येणारा पाऊस कोणत्याही महिन्यात कधीही पडू लागल्याने हवेत गर्मीचे प्रमाण वाढत आहे हे असेच सुरु राहिले तर मानवी जिवन ही धोक्यात येईल यामुळे वनखात्यासह व संबंधितानी याकडे लक्ष देऊन वणवे लावणार्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी यांनी केली आहे.