कशेळेतील व्यापार्‍याच्या खून प्रकरणाचा उलगडा नाही

पोलिसांची पथके तैनात

| नेरळ | प्रतिनिधी |

कशेळे गावातील ज्वेलर्स दुकानाचे मालक यांचा मृतदेह (दि.4) पहाटे कशेळे- नेरळ रस्त्याच्या कडेला शेतात आढळून आला होता. त्यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांच्या अनेक टीम तैनात करण्यात आल्या असून, जिल्ह्यातच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी जाऊन तापसी अधिकारी यांना काही सूचना करीत तपासकार्यात महत्वाचे मार्गदर्शन केले.

रविवारी पहाटे त्यांचा मृतदेह त्यांच्या अपघातग्रस्त दुचाकीसह आढळून आला होता. (दि.4) रायगड पोलिसांचे श्‍वान देखील घटनास्थळी कशेळे नेरळ रस्त्यावर वाकस पुलापासून नेरळ कडे जिते गावाच्या हद्दीत अपघात झाला त्या सर्व जागेची पाहणी श्‍वान पथकाने केली होती. त्यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाचा तपास करण्यासाठी चार टीम तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात त्या भागातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम टीम कडून सुरु असून मोबईल फोन मृतदेहाच्या जवळ आढळून आला नसल्याने, तसेच त्यांच्या जवळ कोणतीही आर्थिक रक्कम आढळून आली नसल्याने पोलिसांचं तपास अपघात दाखवून खून झाला या दृष्टीने सुरु आहे.

श्‍वान पथकास नेरळ पोलीस यांच्या मदतीला कर्जत आणि खालापूर येथील पोलीस अधिकारी तसेच अलिबाग येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम तपासात सक्रिय आहे. तपास अधिकारी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मदतीला कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. कोल्हे असून, आता खुनाच्या तपासाला गती देण्यासाठी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाची टीम पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या सह काम करीत आहे. त्यानंतर आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी नेरळ येथे येऊन अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तपासकामात वेगवेगळे अँगल तपासून पाहण्याची सूचना केली. अतिक्रित पोलीस अधीक्षक झेंडे यांच्याकडून केलेल्या तपास कामाचा आढाव नेरळ पोलीस ठाणे येथे घेतला.

Exit mobile version