| कोर्लई | प्रतिनिधी |
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुडसह काशिद समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर, काही ठिकाणी पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, शुभ्र वाळू पर्यटकांना आकर्षित करत असते. तसेच, या ठिकाणी पर्यटकांच्या सोयी-सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असललेली स्पीडबोट, पँरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा व उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. पर्यटकांना विविध खाद्य-पेय, चहा-नाष्टा याची सोय देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे शनिवार-रविवारी कोर्लई समुद्रकिनारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुरुडसह काशिद समुद्रकिनारा फुलला असून थर्टीफस्टसाठी लाँज बुकिंग फुल झाले आहेत. यावेळी पर्यटकांसह स्थानिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुरूड किनारे फुलले
