मिनीट्रेनचा नॅरोगेज मार्ग होणार दरड मुक्त

सगुणा रूरल फाउंडेशनचा प्रकल्प
। नेरळ । वार्ताहर ।
ब्रिटिश काळात सुरु झालेल्या नेरळ-माथेरान-नेरळ या नॅरोगेज वर चालविल्या जाणार्‍या मिनीट्रेनचा मार्ग 2005 मध्ये माथेरान डोंगरात झालेल्या अतिवृष्टी नंतर धोकादायक बनला आहे. त्यानंतर पुढे सातत्याने या डोंगरात पावसाळयात दरवर्षी दरडी कोसळण्याच्या आणि माती तसेच दगड खाली येण्याच्या घटना घडत आहेत. त्याचा परिणाम देशभरातील पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान-नेरळ हि मिनीट्रेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. तर गेली दोनवर्षे हि गाडी बंद ठेवावी लागली आहे.त्यामुळे मध्य रेल्वे कडून या मार्गावर शेखर भडसावळे यांच्याकडून जंगल, डोंगर आणि वणवे वाचविण्याचा प्रयोग राबविला जात आहे.
मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गाच्या डोंगर भाग असलेल्या भागात पाच मीटर अंतरावर हि झाडे उतार असंही लावली गेली आहेत. त्यातचवेळी दरीच्या भागात जशी जागा उपलब्ध आहे त्या स्वरूपात झाडे लावण्यात आली आहेत. या सर्व प्रकारच्या तब्बल 25000 झाडांची निर्मिती सांगून रूरल फाउंडेशन कडून करण्यात आली आहे.दरडी कोसळू नये आणि डोंगरात भुस्खनन होऊन माती आणि दगड खाली येऊन नुकसान होऊ नये यासाठी वाला हि वनस्पती चांगले काम करते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर 21 किलोमीटर पैकी 18 किलोमीटर भागात हि सर्व झाडे सगुणा रूरल फाउंडेशन कडून लावण्यात आली आहेत.त्यामुळे सांगून रुरल फाउंडेशन च्या या प्रकल्पामुळे भविष्यात नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेर्ण चा मार्ग दरड मुक्त आणि भुस्खनन मुक्त होईल अशी आशा करूयात. जेणेकरून तसे झाल्यास या मार्गावर चालविली जाणारी नॅरोगेज वरील सर्व पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन पुन्हा नॅरोगेज मार्गावर येईल, त्यामुळे 2005 पासून नेरळ-माथेरान मार्गावर चालविली जाणारी मिनीट्रेनला लागलेले ग्रहण कायमचे नष्ट होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version