मिनीट्रेनचा नॅरोगेज मार्ग होणार मजबूत

21 किमी अंतरावर सिमेंट स्लीपर

नेरळ । प्रतिनिधी ।
गेले तीन वर्षे सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली मिनीट्रेनचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. नेरळ-माथेरान या 21 किलोमीटर लोखंडी स्लीपर काढून त्याजागी सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.मात्र हे काम घाटमार्गात असल्याने कर्मचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मिनीट्रेन ही काळानुरूप बदलत असताना दिसून येत आहे.सुरुवातीला कोळशाच्या इंधनावर चालणार्‍या इंजिनामधून मिनिट्रेन येत होती,हे इंजिन 1983 पर्यंत कार्यान्वित होते. त्यानंतर डिझेलवर चालणारे इंजिन या मार्गावर धावू लागले.या डिझेल इंजिनमध्ये अनेक बदल होत गेले. स्लीपर मध्येही बदल होत आहेत.मिनिट्रेन सुरू झाली तेव्हापासून लाकडी स्लीपरचा उपयोग होत होता. 80 च्या दशकात लाकडी स्लीपर काढून त्याजागी लोखंडी स्लीपर वापरात आली.दरम्यान पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या, रुळाखालाची जमीन वाहून जाण्याच्या, भूस्खलन होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या.याच काळात मिनीट्रेन रुळावरून घसरण्याच्या घटना घडू लागल्या.त्यामुळे मध्य रेल्वेला सुरक्षेच्या कारणास्तव मिनिट्रेन बंद करावी लागली. ही माथेरानची राणी तीन वर्ष बंद असून आता या मिनिट्रेनला युनेस्कोच्या परितोषिकासाठी नामांकन झाले असून आता या मिनीट्रेनच्या मार्गावर सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. घाटमार्ग असल्याने मालवाहू गाडी शिवाय पर्याय नसल्याने हे स्लीपर मालवाहू मिनिट्रेनने नेण्यात येत आहेत. हे सिमेंटचे स्लीपर सोलापूर,मध्य प्रदेश येथून आणण्यात येणार असल्याचे समजते. टप्याटप्याने स्लीपर येणार आहेत.

दृष्टिक्षेप
स्लीपर संख्या:-37500
आलेल्या स्लीपर:-2000
अपेक्षित खर्च:-5 कोटी रुपये

माथेरान मिनीट्रेनच्या 21 किलोमीटर घाटमार्गावर लोखंडी स्लीपर काढून सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम सुरू झाले आहे.हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मिनिट्रेन नेरळ-माथेरान मार्गावर अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार आहे.
पी.डी.पाटील,जनसंपर्क अधिकारी ,मध्य रेल्वे

Exit mobile version