| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा वसाहत परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सेक्टर 8 आणि सेक्टर 13 भागात लहान पिल्लांसह कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. या परिसरातील शाळांच्या आवारातही भटके कुत्रे मुक्तपणे फिरत असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण होत आहे. पालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पनवेल महानगरपालिके कडून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण व निर्बीजीकरण केले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
