सागरी सेतू वर्षभरात वाहतुकीसाठी खुला

। उरण । वार्ताहर ।
मुंबई पारबंदर प्रकल्पातील शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू 2023 अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सागरी सेतूमुळे नवी मुंबईतून अवघ्या 20 मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचणे शक्य होईल, असा आशावाद महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला. मात्र, मुंबईतून नवी मुंबईत जलदगतीने पोहोचण्यासाठी नागरिकांना अजून वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

द नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (नरेडको) कर्जत-नेरळ शाखेच्या वतीने गुरुवारी ‘परवडणारे शहर मुंबई 3.0’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास बोलत होते. राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) महानगर प्रदेशाला मुंबई जोडण्यासाठी निरनिराळ्या प्रकल्पांचा विचार करीत आहेत. त्यापैकीच हा एक प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version