वृद्धेस फसवून दागिने लंपास

। पनवेल । वार्ताहर ।
70 वर्षीय वृद्ध महिलेस फसवून तिच्याकडे असलेले जवळपास 1 लाख 80 हजारांचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना पनवेल शहरातील टपाल नाका येथील शनी मंदिराजवळ घडली. यमुना वास्कर (वय-70, रा.-कुंडेवहाळ) या चिखले येथे राहणार्‍या त्यांच्या मुलीस भेटण्यासाठी जात असताना टपालनाका परिसरात दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळ येऊन तुम्हाला 1700 रू. मिळवून देतो असे सांगून त्यासाठी तुमच्या अंगावर असलेले दागिने काढून पाकिटात ठेवून द्या व सदर पाकीट तुमच्या पिशवीत ठेवा असे सांगून या दोघांपैकी एका इसमाने त्यांना हजार रूपये दिले तसेच पाकीट असलेली पिशवी त्यांच्या हातात दिली व आम्ही लगेच येतो असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने सदर महिलेने पिशवी तपासली असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. त्यामुळए आपली फसवणूक लक्षात येताच याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात कऱण्यात आली आहे

Exit mobile version