पालदाड परिसर झाला खड्डेमुक्त

खड्डे बुझविल्याने प्रवासीवर्गाला दिलासा
खांब-रोहा | वार्ताहर |
खांब-पालदाड-रोहा या मार्गावरील पालदाड नदी पुलाच्या रस्त्यावरील भागातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुझविल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. या भागातील रस्त्याची अवस्था पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दयनिय झाली होती. परंतु, संबंधितांनी याकडे लक्ष न दिल्याने सुरुवातीच्या पावसाळ्यात येथील रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडण्यास प्रारंभ झाला. मोठे पालदाड पूल ते उडदवणे गावापर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाल्याने येथून मार्गक्रमण करणे मोठे जिकिरीचे होऊन बसले होते. तर, पावसाचे पाणी खड्ड्यात तुंबल्याने व खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही बाईकस्वारांना अपघातालाही सामोरे जावे लागले आहे. येथील रस्त्याची गंभीर समस्या लक्षात घेता येथील मालसई ग्रातपंचायतीच्या वतीने या भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुझविल्याने सद्यःस्थितीत वाहनचालक व दैनंदिन प्रवासी वर्गाला थोडाफार दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version