तळोजात १० एकर भूखंडावर उभे राहणार वाहनतळ

एमआयडीसीकडून अवजड वाहनांसाठी नियोजन;तळोजातील पार्किंगचा प्रश्‍न मार्गी
। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनाच्या पार्किंगचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहे. एमआईडीसीतर्फे औद्योगिक वसाहतीत शेकडो वाहने उभी राहतील, अशा वाहनतळाच्या कामाला सुरवात झाली आहे. याबाबत खासगी कंपनीला वाहनतळ उभारण्याचे काम देण्यात आल्याची माहिती एमआयडीसी अधिकार्‍यांनी दिली. 876.97 हेक्टरवर वसलेल्या तळोजा औद्योगिक परिसरात जवळपास साडेनऊशेच्या आसपास कारखाने आहेत. कारखान्यात लाखो कामगार काम करतात. देशभरातून तळोजा औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल घेऊन येणार्‍या वाहनांची संख्या देखील शेकडोत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात येणार्‍या अवजड वाहनांसाठी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामध्येच वाहनतळ असणे आवश्यक आहे. मात्र अनेक कारखान्यात अवजड वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने कारखान्याशेजारील मोकळ्या रस्त्यावर अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकदा गंभीर अपघात होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात येणार्‍या अवजड वाहनांसाठी एमआयडीसी तर्फे अधिकृत वाहनतळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून करण्यात येत होती. कारखानदारांच्या या मागणीचा विचार करुन एमआयडीसीच्या माध्यमातून दीपक फर्टीलायझर कंपनीसमोरील तोंडरे गाव हद्दीत जवळपास साडेसात एकर भूखंडावर 155 अवजड वाहन उभी राहतील, इतक्या क्षमतेचे वाहनतळ उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

18 कोटी रूपये खर्चऔद्योगिक क्षेत्रातील वाहनतळ विकसित करण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 18 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. वाहनतळाच्या बाजुलाप 8 फूट उंचीची भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच वाहन चालकांसाठी आराम गृह, स्वच्छता गृह तसेच वाहन दुरुस्ती व सर्व्हिसिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. व्यवसायिक संकुलाच्या विक्रीतून करणार खर्चवाहनतळ विकसित करण्यासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद करण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून वाहनतळ परिसरात व्यवसायिक संकुल उभारण्यात येणार आहे. या व्यावसायिक संकुलातील आस्थापनाची विक्री करुन वाहनतळ विकसित करण्यासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. वाहनतळ विकसित झाल्यानंतर वाहनतळावरील व्यवस्था पाहण्यासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.- अनंत गोगटे, अधिकारी, एमआयडीसी

Exit mobile version