पक्षकारांना जलदगतीने न्याय द्यावा

न्या. अमित बोरकर यांचे प्रतिपादन
| माणगाव | प्रतिनिधी |
वकील व न्यायाधीशांनी एकत्र काम करून जलद गतीने न्याय देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या पक्षकारांना या न्यायालयाचा फायदा होऊ शकेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अमित बोरकर यांनी रविवारी (5 मार्च) व्यक्त केले. माणगाव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत, माणगाव न्या. माणगाव कोले, जिल्हा न्यायालयाचे पदाधिकारी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मानकर, आ. अदिती तटकरे, अ‍ॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, आनंद यादव, अ‍ॅड. विनोद घायाळ, प्रकाश ओक, जालगावकर, मोहन मेथा, महाड वकील संघटनेचे अध्यक्ष संजय भिसे, संगीता बक्कम, रत्नाकर उभारे, नगरसेवक, नगरसेविका, जिल्ह्यातील वकील संघटनांचे पदाधिकारी व सभासद, माणगाव वकील सर्व पदाधिकारी व सभासद आदी उपस्थित होते. आ. अदिती तटकरेही यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माणगाव वकील बार संघटनेच्या सर्वच पदाधिकारी व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक अ‍ॅड. महेंद्र मानकर यांनी केले.

न्याय देताना न्यायाधीशांनी गुणवत्तेवर व स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून समोरील पक्षकारास न्याय देण्याचा करावा, त्याचबरोबर केवळ तांत्रिक व न्यायालयीन निकालपत्र देण्याचा भर न देता न्यायदानासाठी जास्तीत जास्त वेळ खर्ची करावा व पक्षकारांना झटपट न्याय देण्याचा प्रयत्न करावा. – न्या. अमित बोरकर

Exit mobile version