कोकणच्या विकासाचा मार्ग खडतरच!

राज्यकर्त्यांच्या उदासीनतेचा फटका, साऊथला जोडणार्‍या मार्गाची उपेक्षा कायम
। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासियांची अस्मिता जपणारा असून, त्याची गेली अनेक वर्षांपासून वाताहात सुरूच आहे. या मागार्वर अनेक प्रवासी पयर्टकांचे अपघातात प्राण गेले. तरीही हा मार्ग अपूर्णच राहिला. राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे केंद्राच्या अखत्यारीत असणार्‍या वनजमीन हस्तांतराचा मुद्दा आजही प्रलंबित आहे. तर, केंद्राचा निधी भूसंपादनासाठी काही बाधित शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने विकासाच्या महामागार्च्या कामाला ब्रेक लागत आहे. त्यामुळे कोकणातून गोवा-साऊथला जाणार्‍या महामार्गाची उपेक्षा कायम राहिली. हा महामार्ग कधी होणार हा प्रश्‍नच राहिला आहे.
पळस्पे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्याचे काम अनेक ठिकाणी रखडले असतानाच दुसर्‍या टप्याचे काम इंदापूर ते कशेडी घाट शासनाने हाती घेतले. यादरम्यान रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी वनजमीन, मालकी शेतकर्‍यांच्या जमिनी यांचे कुठे भूसंपादनाची प्रक्रिया, तर कुठे मंजुरीची प्रक्रिया यामुळे रोडावले आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे या शहरातून महामार्ग रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून, गेले अनेक दिवस येथील बाधित होणार्‍या नागरिकांना शासनाकडून मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे या रूंदीकरणाचे काम रखडले होते. मात्र, शासनाने त्यानंतर लोणेरे बाजारपेठेतील काही नागरिकांना नुकसान भरपाई मोबदला दिला. काही नागरिक या मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाचे काम रखडले आहे. तर रस्त्यालगत असणारी पाण्याची पाईपलाईन, विजेचे खांब, रस्त्यालगतच्या गटाराचे काम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत लोणेरे बाजारपेठेतून रस्ता रूंदीकरणाचे कामाचे भिजत घोंगडे पडणार आहे. शासन रूंदीकरणासाठी पाऊल कधी टाकणार, हा प्रश्‍न नागरिकांपुढे उभा आहे.


लोणेरे येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रषास्त्र विद्यापिठाकडे जाणार्‍या मागार्वर भूयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तर गोरेगावकडे जाणार्‍या मागार्वर छोटा उड्डाण पूल होणार आहे. लोणेरे बाजारपेठेतील ज्या नागरिकांची घरे, दुकान, शेड, गाळे, जमीन रूंदीकरणात जाणार आहे. त्या 80 टक्के बाधीत नागरीकांना दिपावली पूर्वीच मोबदला शासनाकडून देण्यात आल्याचे माणगांव उपविभागीय कायार्लयातून सांगण्यात आले आहे. वीस टक्के नागरिकांचा मोबदला प्रष्न प्रलंबित आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चैपदरीकरणाचे काम कांही ठिकाणी रखडले आहे. लोणेरेे शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चौपदरीकरणासाठी नव्याने करण्यात आलेल्या भूसंपादनामध्ये येत असलेल्या बांधकाम, जमीन यांचा मोबदला प्राप्त झाला असून, तो बाधितांच्या खात्यावर जमा करण्यात आहे.
माणगाव तालुक्यातील इंदापूर 84 कि.मी पासून ते वडपाले 110 कि.मी अंतर हे 26.75 कि.मी आहे. हे काम मोर्थच्या निर्देशानुसार नॅशनल हायवेच्या देखरेखीखाली केले जात असून, हे काम एका कंपनीला दिले आहे. यादरम्यान इंदापूर शहराला 3.1 कि.मी.चा बाह्यमार्ग तर माणगाव शहराला 7.5 कि.मीचा बाह्यमार्ग असे दोन बाह्यमार्ग तसेच एक मोठा पूल, एक छोटा उड्डाण पूल, तसेच स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी भूयारी मार्ग, तीन रेल्वे उड्डाण पूल तसेच ढालघर फाट्यापुढे रायगडला जाणासाठी एक पूल त्याचबरोबर सुमारे 60 छोटे मोठे पूल उभारण्यात येणार आहेत. या कामात केंद्र सरकारच्या अंतगर्त येणार्‍या वनजमीन हस्तांतर करून देण्याचा मुद्दा व शेतकर्‍यांच्या जमीन भूसंपादन करून देण्याचा प्रश्‍न अपूर्ण राहिल्यामुळे या महामार्गाचे काम 40 टक्के पूर्ण झाले उर्वरित 60 टक्के काम अपूर्णच राहिले आहे.

Exit mobile version