| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
खाडी, नदीमध्ये मासेमारी, चिंबोरी पकडण्याचा छंद आजही गावोगावी आहे. सध्या अडगळीतील कंदील काढून मासे पकडण्याची लगबग सुरू झाली आहे. अडगळीतील कंदिलातून प्रकाशाची वाट आता निर्माण करणार आहेत.
पुर्वी रॉकेलवर चालणारे कंदिल मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. रात्रीच्यावेळी घरात उजेड आणण्यासाठी या कंदीलाचा वापर अधिक केला जात होता.
लग्नसराईसह मिरवणूक आदींसाठी रात्रीच्या वेळी कंदीलच्या प्रकाशाची वाट मिळत होती. परंतु, बॅटरीच्या जगतासह विजेच्या वापरामुळे कंदिलचा वापर हळूहळू कमी होऊ लागला. त्यात रॉकेलही मिळणे कठीण झाल्याने कंदिलची मागणी कमी झाली. कंदिलचा वापर कमी झाल्याने ते अडगळीत ठेवण्याची वेळ आली. विजेच्या वापरामुळे पारंपारिक कंदिल कालबाह्य होऊ लागले. परिणामी कंदिलाला घरातील कोपऱ्यात ठेवण्या आले. मागील पाच वर्षापुर्वी निसर्ग चक्री वादळाने जिल्ह्यातील हजारो गावांतील लाखो घरांतील वीज पुरवठा खंडीत झाला. महीनो महिने घरात वीज पुरवठा नसल्याने दिवाबत्ती, मेणबत्तीच्या अधारावर रात्र काढण्याची वेळ नागरिकांवर आली.
अखेर घरातील कोपऱ्यात पडून असलेले रॉकेलवर चालणारे कंदिल काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्या कंदिलचा आधार या कालावधीत नागरिकांना मिळाला. त्यामुळे हे कंदिल पुन्हा दिसू लागले. आता पावसाळी हंगाम असून नदी, खाडीमध्ये पाणी साचले आहे. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी मासेमारीसाठी कंदिल उपयोगी ठरते. त्यामुळे हे कंदिल आता काढण्यास सुरुवात झाली आहे. अडगळीतील कंदिलातून प्रकाशाची वाट मिळू
लागली आहे.







