नगरपंचायतीने बसविले पथदिवे
| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली स्मशानभूमीकडे जाणार्या मार्गावर पथदिवे तसेच स्मशानभूमीला अनेक वर्षे वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. रात्री अंत्यविधी करताना प्रचंड गैरसोय होत होती. मात्र, नव्याने स्थापित नगरपंचायतीमार्फत येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
स्मशानभूमीत दिवे नसल्याने अंत्यविधी करण्याची वेळ आल्यास खासगी व वैयक्तिक वाहनांचे दिवे सुरू करून किंवा हातात बॅटरी घेऊन अंत्यविधी उरकले जात होते. या समस्येची दाखल घेत, नव्याने स्थापित झालेल्या नगरपंचायतीने कारभार हाती घेतल्यानंतर पाली येथील महत्त्वाच्या समस्यांना प्राधान्य देत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्या विशेष प्रयत्नातून स्मशानभूमीकडे जाणार्या मार्गावरील पथदिव्यांची तसेच स्मशानभूमीतील विजेची सोय करण्यात आली आहे. विजेची सोय झाल्याने गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.