रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डबॉयच्या दिली कानाखाली

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल

I माणगाव I सलीम शेख I

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

 सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी  निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली.

त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व  दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला.

याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

Exit mobile version