मोदी सरकारला जनताच काय तो धडा शिकवेल

। सोलापूर । प्रतिनिधी ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित उद्योग व्यवसाय तसेच कुटुंबियांवर टाकलेल्या धाडसत्रावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कमालीचे संतापले असून, सत्तेचा गैरवापर राज्यकर्ते कसा करतात याबाबत निश्‍चित लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत,असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांवर आणि त्यांच्या बहिणींच्या व्यवसायांवर देखील आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येत आहेत. यावरून पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला.

Exit mobile version