। पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील डोलघर गावातील भवानीमातेच्या मूर्तीची नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या प्रकरणात पनवेल तालुका पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. डोलघर गावात राहणारा आरोपी आदेश खोत मंदिरामध्ये घुसला होता. त्याने भवानी मातेच्या मूर्तीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. मूर्तीच्या तोंडावरील भाग, तोंडावरील शेंदुराचा लेप काढून अपवित्र केले. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्याने तक्रार करण्यात आली. यावेळी पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेताना ग्रामस्थांना शांत केले. तसेच आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.






