| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव-निजामपूर रस्त्यावर कोस्ते गावच्या हद्दीत पिकअपची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. सदरचा अपघात मंगळवार (दि.10) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद नेहा नितीन पाटेकर (वय-36) रा. वाकी ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या अपघातात दुचाकीचा चालक नितीन पाटेकर (वय-40) रा. वाकी ता. माणगाव हे जखमी झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. तुणतुणे हे करीत आहेत.