। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील मोठीजुई येथील 400 हून अधीक वर्षांपेक्षा जुने असलेल पिंपळाचे झाड कोसळल्याची घटना सोमवारी (दि.1) रात्री घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. तसचे, पिंपळाचे झाड पडल्याने गावातील ये-जा करणार्या वाहनांची रहदारी ठप्प झाली असून मोठीजुई गावातील बहुतेक ठिकाणी विजेचे खांब पडले असल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पडलेले विजेचे खांब नव्याने त्वरित बसवून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जनतेतून मागणी होत आहे. तसेच, ज्या नागरिकांचे या घटनेमुळे आर्थिक नुकसान झाले आहे त्या नागरिकांना भरपाई मिळावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.