| सुकेळी | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड या दरम्यानमधिल अपघातासाठी सर्वांत धोकादायक असलेल्या सुकेळी खिंडीमधील तो महाभयंकर खड्डा वाहनचालकांसाठी धोक्याच ठरु लागला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना सर्वांनाच जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे.
सुकेळी खिंडीमध्ये रस्त्याची अवस्था ही बिकट झाली आहे. सुकेळी खिंडीतील त्या एका महाभयंकर खड्ड्यांमुळे खिंडीमध्ये अपघातांची मालिका सुरुच आहे. दिवसाढवळ्या या खड्ड्यांमुळे मोठ मोठे अपघात होत आहेत, तर रात्रीच्या वेळेस हा खड्डा दिसत नसल्यामुळे काही दिवसांमध्ये याच खड्ड्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होऊन काही जणांचे बळी गेले, तसेच काहींना अपंगत्व आले आहे. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तो धोकादायक असणारा खड्डा अजुन किती जणांचा बळी घेणार ही चिंता वाहनचालकांमध्ये पडलेली असुन महामार्गाच्या कामाच्या बाबतीत नाराजीचे सुरू उमटत आहेत.