अलोरेतील खड्डे विद्यार्थी संघटनेने बुजविले

| चिपळूण । प्रतिनिधी ।
अलोरे येथील रस्त्यावर खड्डे पडले असून खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अलोरेतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक व विद्यार्थी संघटनेने आ शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बाबू साळवी यांच्या नेतूत्वाखाली खड्डे बुजविण्यात आले त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की अलोरे मोहल्ला आणि स्वयंभू मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे पावसाळ्यात पादचारी व दुचाकी धारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर दोन तीन अपघात सुद्धा झाले आहे ही बाब लक्षात घेऊन अलोरे येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक व विद्यार्थी संघटना यांनी श्रमदानातून खड्डे बुजविले. यावेळी योगेश मोहीते,संजय मोहिते, रोहित देवरे,किरण मुनावली,राकेश चव्हाण,साहिल चिपळूणकर,राकेश लाड, सचिन भेलेकर,संदीप धामणस्कर ,जीबरान कडवेकर,शुभम केळशीकर,अजय सोनार,सन्जोत जाधव,विशाल जाधव,भाऊ मोहिते,राकेश जाधव, आरर्षद शेख, प्रमोद महाजन आदी उपस्थित होते.

Exit mobile version