चौपदरीकरणाच्या कामाची दूर्दशा


पार्ले-चांढवे येथे उभारलाय टोलनाका
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील चौपदरीकरण कामाचा सुमार दर्जा उघड होत असताना पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील पार्ले आणि महाड तालुक्याच्या सीमेवरील चांढवे गावांच्या मध्यभागी टोलनाका उभारण्यात आला आहे.

चौपदरीकरणाच्या दुसर्‍या इंदापूर ते कातळी या दुसर्‍या टप्प्यातील एलऍण्डटी ठेकेदार कंपनीने सुरू केलेल्या कामातील अडथळे आणि खड्डे यांच्यासह अपूर्ण कामे यांचा विचार करता पोलादपूर व महाड दरम्यान चांढवे ते पार्ले गावांच्या मध्यभागी टोलनाका उभारून कोकणातील प्रवाशांना या अडथळयाची शर्यतीत सहभाग घेण्यासाठी शुल्क आकारणी याठिकाणी होणार असल्याने जोपर्यंत चौपदरीकरणाचा रस्ता बिनधोक व सुरळीत होत नाही तोपर्यंत टोलनाका नाही, अशी भूमिका कोकणातील सर्वच राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटना आणि महामार्गालगतच्या ग्रामस्थांनी घेण्याची गरज आहे.

Exit mobile version