भाजप आमदारासोबतची ऑडिओ क्लीप व्हायरल
वर्धा | प्रतिनिधी |
वेगळ्या विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव नाही, अशी माहिती केंद्रानं लोकसभेत दिली होती. त्यानंतर विदर्भवादी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबतची एक ऑडिओ क्लीप समोर आली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळं फासण्याचा डाव असल्याचं कळतंय. भाजप आमदार समीर कुणावार आणि प्रवीण महाजन या दोन व्यक्तींमधील ही क्लीप आहे.
समीर कुणावार हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार आहेत. तसेच गडकरींचा रविवारी हिंगणघाट येथे कार्यक्रम होता. यावेळी गडकरींद्वारे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा केंद्रात पाठविण्याची मागणी प्रविण महाजन यांनी ऑडिओ क्लीपमध्ये केली आहे. आमच्याजवळ शाई असेल आणि आम्ही गडकरींना वेगळ्या विदर्भाची मागणी करू, असं महाजन भाजप आमदार समीर कुणावार यांना सांगतात. मात्र, या गोष्टी हिंगणघाटात नको, तुम्हाला नागपुरात जाऊन जे करायचे ते करा, असा सल्ला समीर कुणावार यांनी दिला आहे.