पेण | वार्ताहार |
पोलीस ठाण्यातील पोलिसांना पोलिसाने मारहाण होण्याचा प्रकार पेण पोलीस ठाण्यात घडला. पोलिस कॉन्स्टेबल शामराव भिमराव जाधव, रा.शिवाजी नगर रामवाडी, हे अलिबाग येथे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.त्यांच्याविरुद्ध फणसडोंगरी येथे राहणार्या फिर्यादी महिलेने पेण पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या मनाविरूध्द जाधव यांनी शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याची व आपल्या मुलांना जिवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार केली. हे समजल्यावर शामराव जाधव यांनी पेण पोलिस ठाण्यात जावून आरडाओरड केली. तसेच पेण पोलिस ठाण्यात डयुटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांना शिविगाळ करून पोलिस शिपाई मढवी व पोलिस नाईक गुजराथी यांना मारहाण केली.
तसेच महिला पोलिस उपनिरिक्षक घाडगे यांना देखील शिविगाळ केल्याचा प्रकार घडला. या दोन्ही वेगवेगळया फिर्यादी नुसार शामराव जाधव यांच्या विरूध्द 376 व 3ं53 अन्वये गुन्हा नोंद झाला असून याबाबत पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस ठाणे अधिक तपास करत आहे.