महाड | प्रतिनीधी |
नवर्याने बायकोला पेट्रोल टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ढालकाठी बिरवाडी येथे शुक्रवारी रात्री घडला. निशा दीपक झांजे (वय 28) सध्या राहणार ढालकाठी व तिचा पती दिपक अशोक झांजे वय 36 मुळगाव बारसगाव पठार यांचे काही कारणास्तव भांडण झाले त्यामुळे दीपक झांजे याने आपल्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केली व मारहाण करून न थांबता तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ही महिला 60 ते 70 टक्के भाजल्यामुळे तिला बिरवाडी येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये हलविण्यात आले.
या घटनेची माहिती समजतात एमआयडीसी पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात दिले. रात्रीच्या वेळी कोणतेही वाहन या महिलेला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी उपलब्ध नसताना देखील ढालकाठी येथील पप्या अहिरे या इसमाने आपल्या टेम्पोमध्ये या महिलेला बिरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी आणून सोडले. संबंधित महिला साठ ते सत्तर टक्के भाजल्यामुळे बिरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर बिराजदार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून पुढील उपचारासाठी महाड येथील सरकारी रुग्णालय येथे जाण्यास सांगितले. अधिक तपास एमआयडीसीचे प्रभारी पोलीस अधिकारी युवराज खाडे हे करत आहेत.