पोलीस चौकी दोन दिवसांपासून अंधारात

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठेतील पोलिस चौकीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने पोलिसांना काम करताना अडचण निर्माण होत आहे. पोलिस चौकीत विद्युत पुरवठा नसल्याने ट्रॉफीक सहाय्यक पोलिस फौजदार -किशोर बठारे व संतोष गायकवाड यांनी भ्रमणध्वनी व्दारे कार्यकारी अभियंता -सुर्यवंशी यांना कळविले होते. आमची तक्रार नोंद करण्यास सांगितली होती.

त्यावेळी सुर्यवंशी यांनी सांगितले की मुरुड शहराचे इंजिनिअर -राठोड यांना कळवतो.ते ताबडतोब येऊन खंडीत झालेला विद्यूत पुरवठा सुरळीत करून देतील. पण आज दोन दिवस होऊन गेले तरी विद्युत महावितरण चे कर्मचारी लाईट चालू करण्याकरिता पोलीस चौकी जवळ फिरकलेच नाही. पोलिसांनी तक्रार करुन सुधा विद्युतकर्मचारी विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी येत नसतील तर आम जनतेचा काय होतं असेल. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची दखल घेऊन कर्मचारीची कान उघडणी केली पाहिजे. अशी मागणी होत आहे. मुरुड बाजारपेठेतील पोलिस चौकी अंधार होत असल्याने ट्रॉफीक सहाय्यक पोलिस फौजदार -किशोर बठारे, पोलिस नाईक – सुरेश वाघमारे व पोलिस शिपाई – सागर रसाळ बाहेर पडताना दिसत आहेत.

Exit mobile version