पोलीसांनी दिले कायद्याचे ज्ञान

| कोलाड | वार्ताहर |

संपूर्ण भारत देशात सोमवार 1 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी कोलाड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील,जागरूक नागरिक यांची सोमवारी सायंकाळी सभा घेण्यात आली. या सभेत नवीन कायद्याचे महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कायदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे. या कायद्यामुळे नागरिकांना नवीन अधिकार आणि सुविधा मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांना काय करावे लागेल, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, आणि त्याचे कायद्यानुसार पालन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मोहिते मार्गदर्शन करताना म्हणाले की, इंग्रजांनी आपला एक छत्र शासन करण्यासाठी कायदे बनवले होते. त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे पाहिजे तसे तीन वेळा कायद्यांमध्ये बदल केले होते. आत्ता आपल्या देशात राज्याचे आणि केंद्राचे असे दोन प्रकारचे कायदे आहेत. राज्याचे कायदे राज्यात लागू होतात तर केंद्राचे कायदे देशभर लागू होतात. ते पुढे म्हणाले. तसेच गोवंश हत्या कायदा कोणीही हातात घेऊन नये, गोवंश प्रकरणी तुम्हाला काहीही माहीत मिळाली तर पोलीसांना कळवावे. माहिती देणाऱ्यांची नांवे गुप्त ठेवण्यात येतील असे ही सांगितले. जेणेकरून गोवंश चोरांचा किंवा गोवंश हत्या करणाऱ्याचा तुमच्यावर डुक राहणार नाही, कारण ते तुमचा घातपात करू शकतात. म्हणून कोणीही याबाबतीत कायदा हातात घेऊ नये. फार्म हाऊस विविध हॉटेल, बार, वॉटर पार्क या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तसेच असे होत असेल तर त्याबाबत पोलीस ठाण्यात माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धबधब्यांवर पर्यटकांना सुरक्षितरित्या जाण्याच्या तसेच त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास कळवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलीस नितीन मोहिते व उपनिरीक्षक नरेश पाटील यांनी सविस्तर उत्तरे दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष हरिओम टाळकुटे, दादा महाबळे, नरेन जाधव, रवींद्र तारू, संजय कुरले, रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संतोष दळवी, महेश सानप, योगेश कडेवार, आंबेवाडी सरपंच, उपसरपंच नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Exit mobile version