अमेरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागलीय

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी


| वॉशिंग्टन | वृत्तसंस्था |

पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचे तिकीट अमेरिकेने निश्चित केले आहे. अमेरिकेने सहा सामन्यांतून पाच विजयांसह अमेरिकन झोन पात्रता स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही संघाचे गुण हे 10 आहेत परंतु, कॅनडाची धावगती ही अमेरिकेपेक्षा कमी असून त्यामुळे ते मागे पडले. यूएसए क्वालिफायरच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात यूएसएने बर्म्युडाचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात संघाला कॅनडाकडून पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात पुन्हा बर्म्युडाला पराभूत केल्यानंतर अमेरिकेने अर्जेंटिनाचा सलग दोन डावामध्ये पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. बर्म्युडाविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेच्या अंडर-19 संघाने प्रथम फलंदाजी करताना 515 धावा केल्या होत्या. त्यानंतर विरोधी संघाला 50 धावांत गारद करून 450 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे संघाची धावगती ही सर्वोत्तम होती. हेच कारण कॅनडाला मागे टाकण्यात महत्वाचे ठरले.

पात्रता स्पर्धेत अमेरिकेने बर्म्युडा आणि अर्जेंटिनाचा प्रत्येकी दोनदा पराभव केला. पहिल्या सामन्यात त्यांना कॅनडाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी त्यांना हरवत विश्वचषकाचे तिकीट मिळवले. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांनी 2022 च्या हंगामात प्रभावी कामगिरी करून सर्वोत्कृष्ट पूर्ण सदस्य राष्ट्र म्हणून आधीच आपली जागा मिळवली आहे.

पावसाने खोडा
यूएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याला पावसामुळे उशीर झाला आणि गटातील इतर सामने रद्द होऊनही हा सामना खेळवण्यात आला. मात्र, पावसामुळे अखेर सामना 22 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कॅनडाचा संघ 22 षटकांत नऊ गडी गमावून 92 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात अमेरिकेने चार षटके शिल्लक ठेवत शानदार विजय मिळवला. यूएसए आता 2010 नंतर प्रथमच अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. माहितीसाठी की, न्यूझीलंड, नेपाळ, नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यातील क्वालिफायर सामन्यांनंतर दुसऱ्या संघाचा निर्णय घेतला जाईल.

आशिया कप 2023 अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही भारतीय संघाची अजून घोषणा करण्यात आली नाही. आता अशी माहिती येत आहे की, सोमवारी म्हणजेच 21 ऑगस्टला संघाची घोषणा केल्या जाणार आहे. यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2023 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या सर्व संभाव्य खेळाडूंचीही घोषणा करणार आहे.

Exit mobile version