| पॅरिस | वृत्तसंस्था |
अमेरिका सलग अनेक वर्षांपासून ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. अमेरिकेच्या खेळाडूंनी सलग चार ऑलिम्पिकमध्ये पदकतालिकेत अमेरिकेला अव्वल स्थानावर ठेवले आहे. यावेळी अमेरिकेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ( 2024) 126 पदके जिंकली, ज्यात 40 सुवर्ण, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यापैकी राय बेंजामिन याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेत अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. राय बेंजामिन हा वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज विन्स्टन बेंजामिनचा मुलगा आहे.
राय बेंजामिन हा वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या राय यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात क्रिकेट आणि अमेरिकन फुटबॉलपासून केली, परंतु नंतर त्यांनी ट्रॅक इव्हेंटवर लक्ष केंद्रित केले. राय बेंजामिनने 2013 वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप आणि 2015 वर्ल्ड रिलेमध्ये अँटिग्वा आणि बार्बुडाचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर ते यूएस ऍथलेटिक्समध्ये गेले. पॅरिसमधील सुवर्णपदकाव्यतिरिक्त, रायने 2019 आणि 2022 जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीतही रौप्यपदक जिंकले आहे.
रॉय बेंजामिनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली-
रॉय बेंजामिन यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने केवळ 400 मीटर हर्डल्समध्येच नव्हे तर 4400 मीटर रिलेमध्येही सुवर्णपदक जिंकून अमेरिकेचा हिरो बनला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या मुलाच्या यशाबद्दल विन्स्टन बेंजामिन यांनी क्रिकबझसोबत बोलताना म्हणाले की, रॉय बेंजामिन खूप मेहनत घेतली होती. वैयक्तिक सुवर्ण जिंकणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्याने खरोखरच आश्चर्यकारक कामगिरी आहे, असं विन्स्टन बेंजामिन यांनी सांगितले.