कृषिवल इफेक्ट! रस्त्यावर पडलेला खड्डा भरला

| वेनगाव | प्रतिनिधी |

कर्जत चार फाटा येथील नेरळ-माथेरान रस्त्याच्या मार्गावर मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे अनेक वाहन चालकांना दुखापत होऊन त्रास सहन करावा लागत होता. तसेच, या ठिकाणी बंदोबस्तीसाठी कार्यरत असलेल्या वाहतून पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे हा खड्डा भरण्या संदर्भात वाहन चालक, प्रवासी वर्ग व नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. मात्र, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. त्यानंतर कर्जत चार फाटा येथील नेरळ-माथेरान रस्त्याच्या मार्गावर मोठा खड्डा पडला असल्याचे वृत्त शुक्रवारी (दि.11) ‌‘कृषिवल‌’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाने तात्काळ हा खड्डा भरण्याच्या कामाला सुरवात केली. तसेच, परिसरातील खड्डे देखील भरण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालक, प्रवासी वर्ग तसेच येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांनी ‌‘कृषीवल‌’चे आभार मानले आहेत.

Exit mobile version