शेतकर्‍यांची वीजतोडणी तूर्तास थांबविणार

ऊर्जामंत्र्यांची विधानसभेत घोषणा
| मुंबई | वृत्तसंस्था |

शेतकर्‍यांच्या हाती पीक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही. त्याशिवाय वीजतोडणी केलेल्या शेतकर्‍यांची वीजसुद्धा पूर्ववत केली जाणार आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या घोषणेनंतर शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बँकेचे कर्ज त्यामुळे महावितरणची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांची वीजतोडणी हा सभागृहातील मोठा चर्चेचा विषय होता. शेतकर्‍यांना प्राथमिकता देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून तसेच याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वीज तोडणी केलेल्या शेतकर्‍यांचा पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकर्‍यांच्या हातात पीक येईपर्यंत म्हणजेच आगामी तीन महिने कृषि वीज ग्राहकांची वीज तोडणी तात्पूर्त्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाने शेतकर्‍यांच्या वीज तोडणीवरून सरकारवर हल्लाबोल करत शेतकर्‍यांची वीजबिलं माफ करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version