बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा लेखणीची ताकद मोठी

मीनाक्षी पाटील यांचे प्रतिपादन
। मुंबई । वार्ताहर ।
संयुक्त महाराष्ट्राकरिता ज्या कार्यकत्यार्ंनी रक्त सांडले त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र मिळाला याची जाण नव्या पिढीली व्हावी म्हणून पत्रकारांनी आपली लेखणी चालविली पाहिजे.बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा,तलवारीच्या वारापेक्षा लेखणीची ताकद मोठी असते हे सर्वांना उमगले पाहिजे,असे प्रतिपादन माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी मुंबई येथे केले. अत्रेय आणि मनिषा प्रकाशनतर्फे सोमवारी ( 13 जून) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लढलेल्या घराण्याच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघात आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आला होता.यावेळी मीनाक्षी पाटील बोलत होत्या.

या कार्यक्रमाल जेष्ठ पत्रकार मधुकर भावे,मराठी बाणाचे अशोक हांडे,मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ,सिद्धी विनायक ट्रस्टचे संचालक राजाराम देशमुख,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत हप्पे,शेकापचे कॉम्रेड राजेंद्र कोरडे यावेळी उपस्थित होते . माजी खासदार आणि संयुक्त महाराष्ट्राचे नेते उद्धवराव पाटील यांचे नातू अविष्कार पाटील, कृषीवलचे संस्थापक आणि संयुक्त महाराष्ट्र लढ़यातील नेते कै.प्रभाकर पाटील यांची मुलगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील , गुलाबराव गणाचार्य यांचा मुलगा अनिकेत,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते गजाभाऊ ढेणी यांचा नातू आदींचा यावेळी शाल ,श्रीफळ आणि आचार्य अत्रे यांची तसबीर देऊन सत्कार करण्यात आला.

मीनाक्षी पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की,1954 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सुरुवात झाली.माझे वडील हे या चळवळीतले एक सैनिक होते. माझी आई या कार्यकर्त्यांसाठी करिता रात्री बेरात्री उठून स्वयंपाक करायची हे मी सारे अनुभवलेले आहेत. बिहार बिलच्या विरोधात रायगडातील पत्रकारांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे मला तुरुंगवास घडला.अशाप्रकारे तुरूंगात गेलेली मी पहिली पत्रकार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.विद्यमान परिस्थितीवर भाष्य करताना मात्र आज जे राजकारण सुरु आहे ते पाहून मी व्यथित झाले आहे,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या की, मी तशी मराठा ची वाचक .मराठा वाचूनच पत्रकारिता केली.1956 साली मराठा सुरु झाला,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठा चे आणि आचार्य अत्रे यांचे फार मोठे योगदान होते , त्यांचे एक घोष वाक्य होते.

मराठा उचल तुझी तलवार हे आजही मला चांगले आठवते असे त्या म्हणाल्या. माझ्या पेक्षा उध्ववराव पाटील मुख्यमंत्री व्हायले पाहिजे होत,असे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते याची आठवणही मीनाक्षी पाटील यांनी आपल्या भाषणातून काढली. जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रभाकर पाटील यांच्या कड़व्या नेतृत्वा बद्द्ल आठवण सांगितली ते म्हणाले 7 ऑगस्ट 1961 साल असेल अलिबाग़ जवळील एक गरोदर महिला एसटीची वाट उभी होती मात्र गाडी येत नव्हती इतक्यात समोरून कलेक्टरची गाडी आली आणि प्रभाकर पाटील त्यांच्या गाडी समोर उभे राहिले , चालकाला खेचून बाहेर काढले आणि त्या महिले ला रवाना केले ,यामुळे प्रभाकर पाटील यांना नंतर शिक्षा भोगावी लागली अशी आठवणही त्यांनी सांगितली. मात्र आजकालच्या नेत्यांकड़े सर्व सामान्यां साठी लढण्याची वृत्ती दिसत नाही,अशी खंत मधुकर भावे यांनी यावेळी व्यक्त केली .

Exit mobile version