आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी नियामक मंडळाचे अधिकार वापरावेत

श्रीकांत पाटील यांची सूचना
। मुरुड । वार्ताहर ।
पतसंस्थांचे संचालक हे ठेवीदारांचे विश्‍वस्त असुन त्यांची जबाबदारी मोठी आहे. बँकिंग व्यवसायातील स्पर्धात्मक आव्हाने पेलतांना सहकाराचे नियम गांभिर्याने घेतले पाहिज . पतसंस्थांचे आर्थिक स्थैर्य टिकविण्यासाठी संचालकांनी नियामक मंडळाचे अधिकार काटेकोरपणे वापरले पाहिजेत असे महत्वपूर्ण प्रतिपादन मुरुड तालुका सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील यांनी केले आहे.
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश, जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, मुरुड आणि सहाय्यक निंबधक सहकारी संस्था, मुरुड यांचे संयुक्त विद्यमाने मसहकार सप्ताहनिमित्त्यआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन अ‍ॅड. मोहन तांबडकर व्हा.चेअरमन दिलीप जोशी, रायगड जिल्हा सहकार भारती सचिव प्रा. मेघराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
तसेच श्रीराम पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मुरुड तालुक्यांतील जयश्रीराम नागरी पतसंस्थेसह महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, प्रभात ग्रामीण सहकारी पतसंस्था, ताडवाडी, कोर्लई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, वाल्मिकी सहकारी पतसंस्था, मजगाव, काळभैरव नागरी पतसंस्था, मुरुड, मर्चंट क्रेडीट सोसायटी, मुरुड , आदर्श पतसंस्था अलिबाग व परस्पर सहकारी पतसंस्था, मुरुड या 10 पतसंस्थांच्या संचालकांनी सहभाग नोंदविला होता .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मेघराज जाधव यांनी सहकार भारतीचे महत्व विशद करतांना सहकार क्षेत्राचे सक्षमीकरण करण्यासाठी संस्कारीत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजित करत असल्याचे सांगितले. तर श्रीकांत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नियामक मंडळाने एन .पी . ए , सी डी रेशो, सी . आर . आर , एस एल आर रेशो या कडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Exit mobile version