। खोपोली । प्रतिनिधी ।
गेल्या चार दिवसांपासून दररोज सायंकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात मोठ्या उत्साहाने सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या श्रींचे आरास व देखावे बघण्यासाठी तसेच घरगुती दर्शनासाठी गणेशभक्तांसह नागरिकांना बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडू लागले आहे.
खोपोली शहरात शहरात यंदाच्या वर्षी सुमारे 37 सार्वजनिक गणेश मंडळे, तर साडेतीन हजार घरगुती श्रींची स्थापना केलेली आहे. दोन वर्षांत कोरोना महामारीनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे. शहरात यंदाही उंच व मोठ्या गणेशमूर्ती सार्वजनिक गणेश मंडळांनी आणली आहे. घरोघरी गणेशभक्तांनी केलेली आरास व देखावे बघण्यासाठी गणेश भक्तांची उत्सुकता ताणली गेली असतांना गणरायांनी आगमन केल्यापासून दररोज सायंकाळी पाऊस झोडपून काढत असल्याने बाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. अशात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.