मासळीचे भाव वधारले

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मासळीचे दर मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर काही प्रमाणात मच्छीमार नौका 1 ऑगस्टपासून मासेमारी करण्यास समुद्रात जाऊ लागल्या आहेत. तेव्हापासून गौरी-गणपती विसर्जनापर्यंत मासळीचे दर फारच स्वस्त होते. परंतु, उपवासांचे दिवस संपल्यानंतर माशांचे दर वाढले आहेत.

1 सप्टेंबरपासून सर्व प्रकारच्या मासेमारीला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, समुद्रात अजूनही वेगाने वारे वाहत असल्यामुळे काही नौका किनारीच उभ्या आहेत. यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू झाली नसून त्यामुळेही दरावर परिणाम होत आहेत. सध्या कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत असून, तिचे दर मात्र सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. कोळंबीचे दर किलोमागे 300 ते 400 रुपये असे आहेत. श्रावणातील उपवास सुरू झाल्यानंतर पापलेट-बेल्डा 500 ते 600 रुपये किलो दराने मिळत होते. हेच दर रविवारी (दि.15) 1200 रुपयांपर्यंत गेले. तसेच, श्रावणामध्ये सुरमई 300 ते 400 रु. किलो दराने मिळत होती, तीच सुरमई आता 900 ते 950 रुपये पर्यंत मिळत आहे. बांगडा, सरंगा 150 ते 200 रु. किलो आहे.

Exit mobile version