| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्याला समृद्ध अशी 52 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. दिघी ते बागमांडले या परिसरातील किनारपट्टीच्या भागांमध्ये नारळ, सुपारी, त्याचप्रमाणे केळीच्या बागा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. येथील हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहर, आरावि, दिवेआगर, वेळास या ठिकाणी नारळाच्या व सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून नारळाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याकारणाने नारळाचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश व केरळ या राज्यांमधून काही व्यापारी नारळाची रोपे घेऊन श्रीवर्धन परिसरात विकण्यासाठी येत असत. अनेक लोकांनी त्यांच्याकडून ही रोपे घेऊन आपल्या बागांमध्ये किंवा शेताच्या बांधावर लावली होती. केरळ किंवा आंध्र प्रदेशातील असलेल्या नारळांच्या जाती या लहान आकाराच्या आहेत. आपण त्याला महाराष्ट्रात तारवटी नारळ असे संबोधतो. ही लागवड केलेली नारळाची झाडे मोठी झाल्यानंतर त्यावरील पराग कणांचा संसर्ग या ठिकाणच्या ओरिजिनल गावठी नारळावरती झाल्यामुळे, या नारळाचा आकार देखील कमी झाले होणे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे जून 2021 साली श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला होतो. यावेळी जवळजवळ 50% नारळांची झाडे तुटून पडली होती. त्यामुळे नारळाची नवीन लागवड केल्यानंतर साधारण आठ ते दहा वर्षांमध्ये नवीन फळे येण्यास सुरुवात होतात. तसेच, आता नारळाची जात हायब्रीड होत चालल्यामुळे नारळाच्या आकारासह उत्पादनात देखील घट झाली आहे व आकार देखील कमी झाला आहे. कृषी विभागाकडून नारळाचा आकार आणि उत्पादन वाढवण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे बागायतदारांकडून बोलले जात आहे.
नारळाचे भाव भिडले गगनाला
