आवक सुरू मात्र किमती आवाक्या बाहेर
| सुधागड-पाली | वार्ताहर |
हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अजून बराच कालावधी आहे. मात्र, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारात हापूस दाखल झाले आहेत. मात्र, या हापूसच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. तब्बल 800 ते 1000 रुपये डझन मिळत आहेत.
अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सध्या येत असलेले आंबे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कर्नाटक येथील, तर काही रायगड जिल्ह्यातील आहेत. हंगामाआधी हापूस सर्वत्र दाखल झाले आहेत. याशिवाय इतर जातीचे आंबेसुद्धा मिळत आहेत. अनेक खवय्ये या आंब्याचा आनंद घेत आहेत. मात्र, अधिक किंमतीमुळे खवय्ये मनसोक्त खाण्याचा आनंद लुटत नाहीत. मागील वर्षी या महिन्यात यंदापेक्षा खूप कमी आंबे दाखल झाले होते. रत्नागिरी व देवगडचा हापूसदेखील थेट वाशी मार्केटला व मोठ्या बाजारात जात आहे. विविध फार्म हाऊसच्या बागांमधील आंबेदेखील विक्रीसाठी येतील.
सुभाष ओसवाल,
यंदा हापूस आंब्याची आवक लवकर सुरू झाली आहे. अजून हंगाम सुरू नसल्याने व आवक कमी असल्याने किंमती मात्र जास्त आहेत. मागील वर्षी पेक्षा आवक चांगली आहे. किंमत जास्त असली तरी खवय्ये खरेदी करत आहेत.
फळविक्रेते, पाली
अरीफा पठाण,
हापूसच्या किंमती आवाक्या बाहेर गेल्या आहेत. मात्र हंगामाआधी आंबे दाखल झाल्याने चव चाखण्यासाठी खरेदी केले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात अजून तरी हापूसच्या चव चाखता येणार नाही असे वाटते.
हापूस खवय्ये