| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींनी अर्थसंसकल्पीय अधिवेशनावेळी संसदेमध्ये बोलताना आपण ओबीसी असल्याचे म्हटले होते. मात्र, हा दावा खोडून काढत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या जातीबाबत खोटी माहिती पसरवली. त्यांचा जन्म ओबीसी प्रवर्गातील नसून खुल्या प्रवर्गातील असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म मागासवर्ग किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये झालेला नाही. ते खुल्या प्रवर्गातील आहे. ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष जाणूनबुजून लोकांना वेडं बनवत असून, ते ओबीसी प्रवर्गात जन्माला आल्याचा भ्रम पसरवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी ओबीसी प्रवर्गात जन्माला आलेला नाहीत. त्यांचा जन्म गुजरातमधील तेली जातीत झाला आहे. भाजपने 2000 साली या जातीला ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली ही जात खुल्या प्रवर्गात होती, असेही राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त ओदिशा येथील झरसूगुडा येथे ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी ओबीसी प्रवर्गात जन्माला आलेला नाहीत. त्यांचा जन्म गुजरातमधील तेली जातीत झाला आहे. भाजपने 2000 साली या जातीला ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली ही जात खुल्या प्रवर्गात होती, असेही राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त ओडिशा येथील झरसूगुडा येथे ते बोलत होते.