पालीत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
उन्हाळी सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकापैकी बल्लाळेश्‍वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येने भाविक व त्यांच्या त्यांची वाहने पाली दाखल होत आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी गैरसोय होत आहे.

पालीच्या बाह्यवळण मार्गाला मंजुरी असूनही हा मार्ग लालफितीत अडकला आहे. यासंदर्भात अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आले आहे. खाजगी अवजड वाहनांची ये-जा नियमाचे उल्लंघन करणारे चालक, अरुंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पाली दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पाली वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. येथील बल्लाळेश्‍वर मंदिर, मारुती मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही नाक्या वाहतूक पोलिस तैनात असून देखील अरुंद रस्ते व अवजड वाहतूक एकेरी वाहतूक वरून दुहेरी वाहतूक आणि वाहनांची वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा केलेली वाहने यामुळे पोलिसांना या वाहतूक नियंत्रण मिळवणे कठीण होते.

वाहन चालकाने नियमाचे पालन केले पाहिजे अवैध पार्किंग करण्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे.

प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था
Exit mobile version